#तालुकास्तरीय नामनिर्देशनपत्र दाखल करणे आज दि.११ ते दि १२ पर्यत!
यामागचे कारण काय?
बी. एम यळ्ळूर यांनी पत्रकाराना दिली माहिती.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या सन २०२६ ते २०३१ साला करीता प्रक्रिया सुरू झाली असुन राज्य संघटनेचे निवडणुक अधिकारी मेहबूब मुलीमणी यानी या संदर्भात आधिसुचना जारी केली आहे.सदर निवडणुक आधिसुचनेनुसार तालुका स्तरावर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख आज शनिवारी दि.११ रोजी दुपारी १ वाजेपर्यत आहे.याबद्दल चौकशी केली असता कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका पदाधिकारी तसेच. जिल्हा पदाधिकारी यांच्याकडुन अद्याप कोणतीच माहिती मिळू शकत नाही.यावरून दिसुन येते कि,खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकाना निवडणुकीत निवडणुक लढविण्यापासुन तसेच मतदाराना मतदान करण्यापासुन दुर करण्याचा प्रयत्न होत आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ऐवढेच नव्हेतर निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संबधित अधिकार्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाचे तालुका अध्यक्ष बी .एम. येळ्ळूर यानी शनिवारी दि.११ रोजी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.
