#संबधित खात्याने लक्ष देण्याची गरज !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति जंगलाचा तालुका म्हणून ओळखला जातो.
त्याचबरोबर खानापूर तालुक्यात पाऊस ही मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे जंगलभागातील रस्त्याच्याकडेला धोकादायक झाडे कोसळणाच्या मार्गावर आहेत.अशी धोकादायक झाडे संबधीत वन खात्याने तोडुन भविष्यात होणारा धोका टाळावा. अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.
नुकताच खानापूर हेमाडगा मार्गावर भले मोठे झाड कोसळुन वाहतुक खोळंबली.वेळ बलवत्तर म्हणून कोणतीच जीवीत हानी झाली नाही.
मात्र येत्या पावसाळी हंगामात धोकादायक झाडे, वाळलेली झाडे, जुनाट वृक्ष खानापूर तालुक्यात होणार्या मुसळधार पावसात कधी कोसळुन पडतील याचा नेम नसतो.
यासाठी संबधीत सार्वजनिक बांध काम खात्याच्या व वन खात्याच्या अधिकार्यानी खानापूर तालुक्याच्या जंगलभागातील रस्त्याच्याकडेला असलेले धोकादायक वृक्ष तोडूण होणारा धोका टाळावा. अशी मागणी खानापूर तालुzक्यातील जनतेतुन होत आहे.
