संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी मंगळवारी दि.२४ रोजी सायंकाळी पावसाने हजारी लावली.तर तालुक्याच्या नंदगड भागात गारवासह पावसाने झोडपून काढले. तर बिदरभावी, तोपिनकट्टी भागात जोरदार पावसाने शिवारातील मिरची, कलिगडे पिकांचे नुकसान झाले.
मंगळवारी सकाळ पासुनच हवेत उष्णता वाढली होती.दुपारी कडक उन्हामुळे व वाढत्या उष्मा मुळे जीवाची कायली होत होती. दुपार पासुनच पावसाचा अंदाज होता.आकाशात ढग जमत होते. सायंकाळी जोराचा वारा सुटला.व पावसाचा आगमन झाले.
खानापूर शहरात महिण्याभरातला हा पहिलाच पाऊस होता.आता पर्यत खानापूर शहराबाहेर पावसाने हजेरी लावली मात्र मंगळवारी शहरातला पहिलाच पाऊस होता.केवळ अर्धातासच पाऊस झाला.
नंदगडात गारव्यासह पावसाची हजेरी!
नंदगड परिसरात मंगळवारी सायंकाळी गारव्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर गारव्याचा सडा पडला होता.सगळेकडे पाणीच पाणी झाले.
तोपिनकट्टी, बिदरभावी परीसरात पावसाने झोडपून काढले.याभागात शेतकर्याच्या मिरची पिकाचे तसेच कलिंगड पिकाचे ही नुकसान झाले.याभागात मिरची पिक मोटे या प्रमाणात घेतले जाते.त्यामुळे सुरूवातीला मिरची पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातुन नाराजी पसरली आहे.
