#डाँ.गंगा लोकापूर, व नेटबाॅल पट्टू अदिती नाडगौडा यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये स्त्रियासाठी मोफत स्त्री रोग, प्रसुती आणि वंध्यत्व तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडली.
या वेळी या शिबीरात खानापूर शहरासह तालुक्यातील जवळपास ५० स्त्रीयानी तपासणीचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम खानापूर डाॅक्टर असोसिएशन, समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल आणि आशिर्वाद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या वेळी डॉक्टर, हॉस्पिटल व शाळेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष. सत्कार !
यावेळी विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी कु. अदिती डी. नाडगौडा हिने नेटबाॅल या खेळात अंडर-१९ वर्षाखालील संघात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. अदितीची निवड प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक होती — पहिला टप्पा दावणगेरे येथे झाला, तर अंतिम निवड विवेकानंद काॅलेज येथे झाली. केवळ १३ वर्षांची असलेली अदिती ही संपूर्ण संघातील सर्वात लहान खेळाडू असून तिची ही कामगिरी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याबद्दल तिचा शाल ,पुष्पगुच्छ देऊन डाॅ गंगा लोकापूर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. अदिती ही खानापूर डाक्टर असोसिएशन चेअरमन डाँ.डी.ई.ऩाडगौडा यांची कन्या आहे.
तसेच, बेळगाव येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.गंगा लोकापूरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी खानापूर परिसरातील रुग्णांना दिलेली सेवा अत्यंत उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.त्यांचे आशिर्वाद हाॅस्पिटलच्यावतीने शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॅ.गंगा लोकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० पेक्षा अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना मोफत सल्ला, आवश्यक औषधे, आहारविषयक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच गरजेनुसार काही आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया देखील करण्यात आल्या. विशेषतः गर्भवती महिलांना (ANC) स्वतःच्या व गर्भातील बाळाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले, जे अत्यंत उपयुक्त ठरले.
या वेळी सौ.दिव्या नाडगौडा (समर्थ स्कूलच्या मुख्याध्यापिका) यांचा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गेली २० वर्षांहून अधिक काळ खानापूरमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी सेवा देणाऱ्या सौ.युगल चिट्टी यांचाही गौरव करण्यात आला.
आशिर्वाद हॉस्पिटलच्या प्रशासन व व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळणाऱ्या आणि दंतचिकित्सक असलेल्या Dr. Ishrat यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात हॉस्पिटल व शाळेतील सर्व महिला कर्मचारी यांना गुलाबाचे फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाला खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा.
आशिर्वाद हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, नर्स व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डाॅ.इर्षद यानी मानले.

