“खानापूर तालुक्यातुन दहावी परिक्षेसाठी ३८२३ विद्यार्थी देणार परीक्षा”
#तालुक्यात १३ दहावी परीक्षा केंद्रे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सन २०२५-२६ सालातील खानापूर तालुक्यातून इयत्ता दहावीच्या परीक्षेला बुधवारी दि.१८ पासुन प्रारंभ होत असुन एकूण ३८२३ विद्यार्थी परीक्षा देणार असुन खानापूर तालुक्यात एकूण १३ दहावीची परीक्षा केंद्र आहेत.अशी माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यानी दिली.
खानापूर तालुक्यात पुढील प्रमाणे दहावी परीक्षा केंद्र आहे. खानापूर शहरातील सरकारी कन्नड हायस्कूल खानापूर ,मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल खानापूर,मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर,सर्वोदय इंग्लिश मिडीयम स्कूल खानापूर,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल कुप्पटगिरी, बाबूराव ठाकुर पी.यू.काॅलेज जांबोटी,एम जी पी यू काॅलेज नंदगड,चन्नमा राणी हायस्कूल इटगी,लोंढा हायस्कूल लोंढा,होलीक्राॅस इंग्लिश मिडीयम स्कूल बीडी,को पी एस मुगळीहाळ , बी.व्ही. संबरगी पी यू काॅलेज पारिश्वाड,सरकारी हायस्कूल चिकदिनकोप आदी केंद्राचा समावेश आहे.
या वेळी परिक्षेच्या काळात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन परीक्षा केद्रावर काॅपी सारखा गैर कारभार होणार नाही.यासाठी खानापूर क्षेत्र शिक्षणाधिकारी खात्याने दखल घेतली आहे.तेव्हा विद्यार्थ्यानी दहावी परीक्षा शांततेत व शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन बीईओ पी.रामाप्पा यानी केले आहे.
.
