संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मिलाग्रीज चर्च मराठी शाळेत वार्षिक क्रिडा दिन,बक्षिस वितरण व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याना निरोप असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक रेव्ह.,फादर जोसेफ मंतेरो उपस्थित होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून फाँरेस्ट काॅट्रक्टर संतोष बिरजे, रेणूका हार्डवेअरचे मालक संजय ठोंबरे,श्रीमती सेलीना फर्नीडीस, युवा नेते यशवंत गावडे,प्रशांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीता ने झाली.उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक प्रशांत आळवणी यानी केले.
या वेळी विद्यार्थ्यानी पाहुण्याना मानवंदना दिली, व उत्कृष्ट कवायत सादर केले.
पहिली ते चौथी पर्यतच्या विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले.तसेच मराठीमोळे लेझिम सादर केले.
यावेळी उत्कृष्ट खेळांडू म्हणून वेदांत अनंत देसाई व अनुश्री पाटील या ना प्रशस्ती पत्र व स्मृति चिन्ह दे ऊन गैरविण्यात आले.
सन २०२५-२६ सालचा शाळेचा आदर्श विद्यार्थी वेदांत अनंत देसाई तर आदर्श विद्यार्थी नी म्हणून संहिता मल्लापा पाटील याना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह दे ऊन प्रमुख पाहुण्याच्याहस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.गायत्री बिरजे व अमृता पाटील यानी केले. तर आभार शिक्षिका सरिता सुतार यानी मानले.
