#वाहतुकीला आडचण !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिव स्मारक चौक ते जांबोटी क्राॅस पर्यतच्या रस्त्याचे अतिक्रमण झालेल्या दुकानावर नगरपंचायतीने हातोडा उगारला, त्यामुळे रस्त्यावर जागोजागी मातीचे ढिगारे उभारले.
याढिगार्यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्या वाहणाना तसेच पदचार्याना, प्रवाशाना दुचाकी वाहनधारकाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी अतिक्रमणाला सुरूवात झाली.तेव्हापासुन जा गो जारी ढिगारे पडलेआहेत. गेल्या पाच दिवसापासुन या ढिगार्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
#बससेवेला ही प्रारंभ!
गेल्या पाच महिण्यापासुन शिव स्मारक चौकामार्गे ये जा करणारी बससेवा बंद होती.परंतु नुकताच या मार्गे बससेवे ला प्रारंभ झाला.तसेच चारचाकी वाहने ये जा करत आहेत.एकंदरीत शिवस्मारकातुन वाहतुक वाढली आहे.त्यातच मातीचे ढिगार त्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे.
#अवकळी पावसाचाही अंदाज!
होळी पूर्णिमा सन होताच अवकळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जातो.जर अवकळी पावसाने हजेरी लावली तर रस्त्यावरील मातीच्या ढिगार्याने सर्वानाच त्रास होण्याचा अंदाज आहे.तेव्हा अवकळी पाऊस होण्याआधी नगरपंचायतीने रस्त्यावरील मातीचे ढीग हलवावे.अशी मागणी सर्वातुन होत आहे.
