#खानापूर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी दिली माहिती!
#वेणूग्रामच्या डाँ.प्रियदर्शनी कुलकर्णी,डाॅ. गोमटेश कुसनाळ आदीची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रात वन खात्याच्या कर्मचार्याना सेवा बजावताना हिंस्त्र प्राण्यासह अनेक संकटावर मात करताना विषारी सापांशी सामना करावा लागतो.कधी मधमाशांशी सामना करावा लागतो.कित्येक वेळा वन खात्याच्या कर्मचाराना अशा जीव धोक्यात घालुन सेवा बजावावी लागते.अशावेळी वनखात्याच्या कर्मचाराना सर्पदंश,मधमाशांचा हल्ला,जंगली कुत्र्याचे हल्ले झाल्यास प्रथोमोपचार कसे घ्यावे.या बद्दल खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी मार्गदर्शन केले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की,सर्पदंश झाल्यानंतर रूगणाला शांत ठेवणे गरजेचे आहे.
यावेळी सर्पदंश झालेल्या जखमेवर चुकीचे उपाय जसे कापणे, घट्ट बांधणे टाळावे.
आता पर्यत जवळ पास ६ रुग्णाना प्राथमिक उपचार करून घेतल्याची माहिती वनखात्याच्या कर्मचार्याना दिली.
या वेळी वेणूग्राम हाॅस्पिटलचे डाॅ.प्रियदर्शनी कुलकर्णी यानी वन खात्याच्या कर्मचार्याना सर्पदंश व मधमाशांचा हल्ला तसेच जंगली कुत्र्याचे हल्ले आदी हल्यांच्या बद्दल अधिक माहिती दिली.
सर्जन डाॅ. गोमटेश कुसनाऴ यानी वनखात्याच्या कर्मचार्याना प्रात्यक्षिते करून माहिती दिली.
या वेळी आरएफओ श्री नदाफ यानी कार्यशाळे बद्दल माहिती दिली.व वन खात्याच्या अधिकारी व कर्मचार्याच्या कार्यशाळेला उपस्थित डाॅक्टरांचे स्वागत केले .
