#आता गाळ्यांचा लिलाव व टेंडरचा प्रश्न मार्गी लागणार!
“खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अतिक्रमण हटवे पर्यंत खानापूर ब्लॉक कॉंग्रेसची मंडळी सतत काम करत होती.
पहिल्यांदा सर्वे केला यात पण अडथळे आणले गेले प्रशासनावर दबाब आणला गेला परंतु आम्ही नेटाने किल्ला लढविला आणि सर्वेचे काम पूर्ण केले व नकाशा सुद्धा तयार झाला व नंतर मार्किंग सुद्धा आम्ही करून घेतले. आता शिवस्मारक चौक ते कोर्ट इथपर्यंत चा सर्व्हे पूर्ण झाला ,
अतिक्रमण सुद्धा हटविण्याचे काम प्रगतीपथावर झाले. नंगरपंचायत, तहसिलदार , पोलीस प्रशासन पीडब्लूडी वगैरे सर्वांनीच हातभार लावला आहे .
या सर्व कामात खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी प्रशासनास योग्य ते करा हा संदेश दिला होता त्याप्रमाणे काम झाले.
आता पुढील टप्पा म्हणजे तालुक्यात जे जे सरकारी गाळे आहेत जे कित्तेक वर्षापासून त्या त्या लोकांकडेच आहेत ज्यांची मुदत संपून सुद्धा ता .प. व नगर पंचायत गप्प आहेत.अशा सर्व गाळ्यांचा लिलाव हा टेंडर प्रकियेनुसारच झाला पाहीजे यासाठी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस प्राधान्याने काम करेल.
टेंडर प्रक्रिया राबविली तरच लोकांना निरपेक्ष पणे गाळे मिळू शकतील नाहीतर परत दादागिरी व प्रशासनावर दबाब टाकून गाळे घेतले जातील व सामान्य लोकांना गाळे मिळणार नाहीत. सामान्य लोकांवर अन्याय होईल म्हणून खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस ची मागणी आहे. सर्वच्या सर्व गा़्ळ्यांचा लिलाव हा टेंडर प्रक्रियेनुसार करावा. जसा बस स्टॅंड मधील गाळ्यांचा केला आहे.
तेव्हा ता.,प. व नगर पंचायतीनी जे काय डिपोजिट घेतले असेल ते रितसर परत करावे. व पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवावी.
यासंदर्भात जर काही चुकीचे केले गेले तर मात्र खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस गप्प बसणार नाही याची नोंद प्रशासनाने वेळीच घ्यावी. जर काय चुकीची प्रक्रिया
राबविली गेली तर आम्ही लोकायुक्त व माननीय न्यायालयामार्फत योग्य त्या गोष्टी नक्की करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
सरकारी गाळे वाटप सुयोग्य व पारदर्शकपणे पार पाडा ही प्रशासनांस विनंती. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावास बळी पडू नये.
खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या अडीअडचणीमधे सुद्धा आम्ही खंबीरपणे लोकांसोबत उभे आहोत. अशी भुमिका घेतली आहे.
