केळी,ऊस, मिरची,पिकांचा फडशा!
,#शेतकरी हतबल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील आंबोळी, बांदेकरवाडा गावच्या शिवारात गेल्या अनेक दिवसापासुन हत्तीनी उभ्या केळी झाडांचा , नुकताच लावण्यात आलेल्या मिरची झाडाचा, तसेच नुकताच लावणी करून आलेल्या ऊस पिकांचा फाडशा पाडला आहे.
आंबोळी गावातील शेतकरी नामदेव गावडे व पुंडलिक गावडे यांच्या शिवारातील केळीची झाडे , ऊस, तसेच नुकताच लावणी केलेल्या मिरची पिता या फाडशा पाडला आहे.
तसेच बांदेकरवाडा गावातील शेतकरी भागाणा बांदेकर याच्या ही शिवारातील केली, ऊस, मिरची पिकाची प्रचंड नुकसान केली आहे.
याची दखल घेऊन खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी मंगळवारी दि.१७ रोजी जिल्हा वनधिकारी (डी एफ ओ) क्रांती यानी फोन व्दारे संपर्क साधुन निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील आंबोळी व बांदेकरवाडा शेतकर्याच्या शेतातील पिकाची हत्तीने केलेल्या प्रचंड नुकसानी बद्दल जाब विचारला व तुमच्या मालकीच्या शेतातील पिकांचे नुकसान केले तर तुम्ही काय कराल ?असा सवाल केला. तुम्ही अधिकारी ए.सी रूम मध्ये बसुन काहीच करत नाही.तर जंगल भागातील शेतकरीवर्गाच्या कुटूंबाला हत्तीच्या भितीने जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागतात. याचे तुम्हाला कांहीच देणे घेणे नाही.
या हत्तीचा त्वरीत बंदोबस्त करा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करून वनखात्याची बेजबाबदारी चौवाट्यावर आणतील असा ईशारा दिला.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे चेअरमन विनायक मुतगेकर यानी बोलताना सांगीतले की, हत्तीनी लाखो रूपयाचे शेतकर्याच्या पिकांचे नुकसान केले आहे. याची किमत वनखात्याला नाही.तेच शेतकर्यानी वनखात्याच्या चंदन प्लाॅट मधील दोन झाडे तोडली तर त्या शेतकर्याला तरूगांची हवा दाखवण्याची धमकी देता.हे केसे ?असा सवाल केला.
त्यामुळे डी एफ ओ निरूत्तर झाले.एकिकडे शेतकर्याच्या पिकांचे नुकसान डाले तरी चालते. परंतु जंगलातील झाडांची तोड होऊ देणार नाही.याला न्याय म्हणायचा का?
तेव्हा वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.

