#समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १० वी विद्यार्थ्याचा निरोप समारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
विद्यार्थी जीवनात १० वीची परीक्षा ही पहिला ठप्पा असतो. तेव्हा विद्यार्थ्यानी जिद्दीने व डोळ्यासमोर ध्येय ठेवून यश संपादन केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल.
असे सागुन विद्यार्थ्याची व्याख्या सांगताना म्हणाले की, विद्यार्थी मधला वि म्हणजे विवेक दिया मधला धाडस, र मधला रणांगण,थी मधला स्थीर हे गुण म्हणजे विद्यार्थी तेव्हा विद्यार्थ्यानी विवेक,धाडस आणि स्थिरता राखून अभ्यासात परिश्रम घेतले तर यश नक्कीच मिळवाल असे विचार अँड.सुभाष देशपांडे यानी शनिवारी दि १४ रोजी खानापूर येथील समर्थ इंग्लिश मिडीय स्कूलच्या १० वी विद्यार्थ्याच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन एफ.एम.पाटील होते.व्यासपिठावर सचिव डाँ.डी. ई.नाडगौडा,ट्रेजरर डाँ.पी.एन.पाटील, संचालक डाँ.एन.एल.कदम, नागराज गडदार,आदी उपस्थित होते.
यावेळी सचिव डाॅ.डी.ई.नाडगौडा,यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी सरस्वती फोटोचे पुजन अँड.सुभाष देशपांडे यानी केले . तर दिपप्रज्वलन सचिव डॉ डी ई नाडगौडा, संचालक डाॅ.एन .एल.एन.कदम,डाॅ.पी.एन.पाटील, अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा आदीच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सचिव डाॅ.डी. ई.नाडगौडा यानी दहावीच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
तर दहावीच्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी दहावीच्या विद्यार्थ्याना गुलाब पुष्प देऊन निकोल देण्यात आला.
दहावीच्या विद्यार्थ्यानी कॅनडल प्रज्वलित करून निरोप घेतला. तर इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यानी मनोरंजन पर कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्राचार्य बाळकृष्ण हलगेकर यानी मानले.
