संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दि. खानापूर तालुका प्रायमरी टिचर्स को आँप.क्रेडिट सोसायटी लि.ची सन २०२४-२५ सालची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक १२ .१५ वाजता खानापूर शहरातील सरकारी आदर्श मराठी मुलांची शाळा चिरमुरकर गल्ली येथील शाळेच्या सभागृहात बोलविण्यात आली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन एम.व्ही.,कुंभार ( मुख्याध्यापक सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा इदलहोड ) हे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी व्यासपिठावर व्हा.चेअरमन डी. एस.सोनारवाडकर,संचालक वाय.एम.पाटील,के. एच.कौंदलकर, बी.बी.,चापगावकर,एस.एल. हळदणकर, एन.एल.शिवनगेकर,जे. बी.पाटील,एल.व्ही.
गुरव,आय.जे.बेपारी,एस.एम.पाटील,पी.एस मादार , बी.बी.मेदार,
संचालिका सौ.जे. ए.मुरगोड, श्रीमती एस. एस.पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
वार्षिक अहवाल सन २०२४-२५!
- एकूण सभासद ४४७ असुन शेअर भांडवल रू. ७९ लाख,९६ हजार ६३० तर ऱिझर्व फंड सध्या रू.२८ लाख, ८६ हजार,६१४ इतका आहे.बिल्डिंग फंड रू. २० लाख, ३७ हजार ७५८ इतका आहे.सभासद कर्ज रू.६ कोटी,५० लाख, ८० हजार १४० इतके आहे. निव्वळ नफा रू.७ लाख, २५ हजार ,४६० रूपये ६२ पैसे इतका झालेला आहे.
तरी दि.खानापूर तालुका प्रायमरी टिचर्स को.आँप. सोसायटीच्या सभासदानी वेळेत उपस्थित राहुन सहकार्य करावे. असे आवाहन सोसायटीचे चेअरमन एम.व्ही. कुंभार व सर्व संचालकानी केले आहे.
