#वड्डेबैलात लक्ष्मी मंदिराचा चौकट पुजन समारंभ संपन्न!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
मंदिर हे गावचे भूषण आहे.मंदिरामुळे गावच्या सौंदर्यात भर पडते.अशीच भर वड्डेबैल( ता.,खानापूर ) येथील श्रीलक्ष्मी मंदिराच्या उभारणीने पडली आहे. गावच्य़ा सर्वाच्या सहकार्यातुन आज मंदिराच्या इमारतीचा चौकट पूजन कार्यक्रम पार पडला.ही गौरवाची गोष्ट आहे.या मंदिरासाठी मी निधी मंजुर करून मंदिराचे लवकरता लवकर उदघाटन करून लक्ष्मी यात्रा साजरी करू.असे विचार एम.एल .सी चन्नराज हट्टीहोळी यानी बुधवारी दि ४ रोजी वड्डेबैलात चौकट पूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम कमिटी अध्यक्ष व कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के पी पाटील होते
अवरोळी मठाचे श्री चन्नबसव देवरू रुद्र स्वामी यांच्या सानिध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष व वकील संघटना अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी,भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई, एम. डी सदानंद पाटील,भाजप नेते बाबूराव देसाई,माजी ता.प.सदस्य महादेव घाडी, माजी ग्रा.पं.सदस्य कृष्णा कुंभार,मुख्याध्यापक महादेव बांदीवडेकर,शिक्षिका हेमलता कदम,चाप गांव पीकेपीएस उपाध्यायक्षा द्राक्षायणी पाटील संचालक पिराजी कुर्हाडे,सागर कडवी,शिवाजी मादार,माजी सैनिक जयराम पाटील,मारूती पाटील,अरूण पाटील, नारायण पाटील,तसेच एम के हुबळी शुगर्स संचालिका सौ.ललिता पाटील,पीडीओ हणमंत पाटील,जोतिबा खामकर, ग्रा पं.अध्यक्षा गंगव्वा कुरबर,उपाध्यक्षा मालू पाटील, साक्षी पाटील, सचिन पाटील, भालचंद्र पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तावित शिक्षक विलास पाटील यानी केला,उपस्थितांचे स्वागत के पी पाटील यानी केले.
उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिल प्रज्वलन व फोटो पुजन तसेच चौकट पुजन करण्यात आले.
या वेळी बोलताना अँड ईश्वर घाडी म्हणाले की, ग्रामदैवत लक्ष्मी मंदिर उभारणीसाठी गावकर्यानी पुढाकार घेऊन कार्य केले त्याचे कौतुक होत आहे. मंदिराचे काम पुर्ण करून लवकरच मंदिराचे उदघाटन करून मंदिराची शोभा वाढवावी.व लक्ष्मी देवीचा गावावर आशिर्वाद राहवा.असे सांगुन
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी पंचहमी योजनेसाठी ६० हजार कोटी रूपयाच्या बजेट मधुन सर्व दीनदुबळ्या, तळागाळापर्यतच्या महिलाना गृहलक्ष्मी योजनेतुन मदत केली.एवढेच नव्हे तर काॅग्रेस पक्ष स्त्री सबलीकरणासाठी पुढे आहे. खानापूर तालुक्यातील ७७ हजार महिलाना गृहलक्ष्मीचा लाभ मिळाला आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणात के पी पाटील म्हणाले कि,गेल्या अनेक वर्षापासुन लक्ष्मी मंदिर उभारण्याचे स्वप्न गावकर्याचे होते.त्यासाठी गावकर्यानी एकज्यूटीने सहकार्य केले.त्यामुळेच लक्ष्मी मंदिर उभारले.असेच सहकार्य देऊन मंदिराचे काम पूर्णत्वाकडे नेऊ.असे आवाहन त्यानी केली.
या वेळी सत्कार सोहळा पार पडला. कार्यकर्माचे सुत्रसंचालन व आभार पिराजी कुर्हाडे यानी मानले.
