#२ कोटी ९० लाखाचा निधी मंजुर असुन वनखात्याची आडकाटी!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील जटगे हलसाल या ३ किलो मीटर अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २ कोटी ९० लाख रूपये मंजुर करून केवळ वन खात्याच्या आडकटी मुळे रस्त्याचे काम थांबत असेल तर संबधित वन खात्याच्या वरिष्ठ अधिकार्याना जाब विचारून हा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाॅक कांग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी यानी शनिवारी जटगेतील श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना व्यक्त केले.
या वेळी हभप विश्वनाथ देसाई व्यासपिठावर होते.
या वेळी बोलताना पुणे ते म्हणाले की, हल्याळ तालुक्यात , जोड़ा तालुक्यात जंगलातुन रस्ता करताना वनखात्याची आडकटी नसते,कुठच विरोध होत नाही.मग खानापूर तालुक्यातील जंगल भागातील रस्त्याच्या विकास कामाना आडकटी का,? ,खानापूर तालुका पाकिस्तानात आहे? दोन्ही तालुके कर्नाटक राज्यात असताना असा भेद भाव का? असा प्रश्न उपस्थित करून या संदर्भात जिल्हा वनधिकार्याची भेट घेऊन हा अडथळा दुर करून जटगे हलसाल रस्त्याच्या कामाला गती देणार असल्याचे आश्वासन दिले.,लागलीच लोंढा आरएफओ तेज वाय.पी.याना संपर्क साधुन लवकरात लवकर रस्त्याच्या कामा ची आडचण दुर करा असे ठसकावून सा गीत ले,.
त्यानंतर जटगे हलसाल रस्त्याची पाहणी केली . या वेळी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील, प्रवीण सुळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

