#सार काही गुपचुप नाट्यप्रयोग सादर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा (ता. खानापूर ) येथील श्री सिध्दीविनायक यात्रोत्सव निमित्त सा ला बाद प्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती श्रीसिध्दविनायक मंदिरात मंगळवारी दि.२० ते गुरूवारी दि.२२ पर्यत उत्साहित साजरी करण्यात आली.
मंगळवारी श्री मुर्तीला अभिषेक,व श्रीची पालखीतुन मिरवणूक काढण्यात आली.
बुधवारी सकाळी अभिषेक,गण होम,व सायंकाळी सौष्ठव स्पर्धा पार पडल्या.
गुरू वारी दि.२२ रोजी गणेशोत्सव निमित्त अभिषेक,श्रीचा जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी गणेशोत्सव निमित्त रात्री ” सार काही गुपचुप ” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेतू मिराशी होते.ग्राम पंचायत सदस्य तसेच सदस्या सौ.वैशाली कांबळे,सौ.जयश्री नाईक , सौ.संध्या हंडी,मा जी ग्राम पंचायत अध्यक्ष अशोक नेसरीकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते अँड.चेतन मणेरीकर,राजेंद्र रायका, प्रवीण पाटील, बबन अल्लोळकर, तसेच युवा नेता पंडित ओ गले, यशवंत गावडे, गुंजी ग्राप पंचायत उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, शिरोली ग्राम पंचायत सदस्य कृष्णा गुरव आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या वेळी श्री.सिध्दिविनायक मंदिर कमिटीचे अध्यक्ष, भाजप नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलता ना अँड.चेतन मणेरीकर म्हणाले कि गेल्या अनेक वर्षापासुन मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाबूराव देसाई हे स्वत: पुढाकार घेऊन गणेश जयंती साजरी करतात.त्याच्या कार्याचे कौतुक करावे तेवढेे कमीच आहे.यामागे त्याची देवावरील भक्ती दिसुन येते.
लोंढा गावात अनेक विकास कामाबरोबर या मंदिराचा कायपालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानी भाजप पक्षाची मोट बांधण्यात खानापूर तालुक्यात खूप प्रयत्न केले आहेत.
या वेळी शिरोली ग्राम पंचायत सदस्य कृष्णा गुरव यानी बाबूराव देसाई यांच्या कार्याचा गौरव करत गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात त्यानी नेहमी पुढाकार घेतात असे सांगीतले.यशवंत गावडे यानीही आप ले विचार व्यक्त केले.
या वेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाबूराव देसाई यानी बोलता ना गणेश जयंती साजरी करण्यासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

