संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
क्रांती वीर संगोळी रायण्णाच्या क्रांतीच्या जुन्या घटना आजच्या युवकापर्यत पोहचाव्यात, जुना इतिहासाची ओळख व्हावी. या उद्देश्याने नंदगड ( ता. खानापूर ) क्रांतीवीर संगोळी रायण्णा याना फाशी दिलेल्या वट वृक्षाच्या जागेवर शौर्य संग्रहालय उभारल्याने याचा मला मोठा अभिमान वाटतो.क्रांतीवीर संगाळी रायाणा याना नंदगड येथे फाशी दिली.,तर जन्म गाव संगोळी या दोन्ही स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार ,अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी सोमवारी दि.१९ रोजी नंदगड येथील शौर्य संग्रहालयाच्या उदघाटन प्रसंग बोलताना व्यक्त केल्या.
कनक गुरूपीठाचे निरंजनानंदपरी महा स्वामी यांच्या सानिध्यात पार पडलेल्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते.
व्यासपिठावर पालक मंत्री सतीश जारकीहोळी,महिला व बालकल्याण मंत्री लक्षी हेब्बाळकर,मंत्री शिवराज तंगडगी,मंत्री भैरती सुरेश, कर्नाटक गॅरंटी योजना अनुस्थान प्राधिकार एच.एम.रेव्हण,विशेष प्रतिनिधी अशोक पट्टण,महांतेश कैजलगी,आमदार गणेश हुक्केरी,एम एल सी चन्नराज हट्टीहोळी,आमदार राजू सेट,आमदार बाबासाहेब पाटील,आमदार विश्वास वैद्य,
अशोक दळवाई, नगराभिवृध्दी प्राधिकार अध्यक्ष लक्षण चिंगळे,माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष विनय नावलकट्टी, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.
तर गॅरटी योजनाचे अध्यक्ष एच एम रेव्हण यानी प्रास्ताविक केले.
या वेळी पालक मं त्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बाबासाहेब पाटील,आदीची भाषणे झाली.
या वेळी अध्यक्षिय भाषणात आम दार विठ्ठल हलगेकर यानी क्रांति वीर संगोळी रायण्णाच्या इतिहासातील घटनाचा आढावा घेत.खानापूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामाबाबत मुख्यमंत्री सिध्दरामय्या याना निवेदन देऊन यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून द्यावा . अशी मागणी केली.
या वेळी खानापूर तालुका ब्लाँक अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी,शहराध्यक्ष महांतेश राऊत, सूर्यकांत कुलकर्णी, नेते सुरेश जाधव, गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, महादेव कोळी, सुरेश दंडगल,ईश्वर बोबाटे,सह शेकडो कार्य कर्ते उपस्थित होते.

