#विद्यार्थ्याच्या चेहर्यावर हसू!
खानापूर प्रतिनिधी
गुंजी ( ता .खानापूर ) ये थे नुकताच पार पडलेल्या कार्यक्रमा निमित्त आमदार विठ्ठल हलगेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम पार पडल्यानंतर
गुंजी( ता.खानापूर ) येथील सरकारी आर एम एस हायस्कूलच्या विद्यार्थ्याना तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या भेटीची तळमळ होती. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यानी वेळातवेळ काढुन विद्यार्थ्याच्या सोबत समस्या जानुन घेऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
कारण आमदार विठ्ठल हलगेकर मुळातच शिक्षकांचा पिंड असलेले व्यक्तीमत्व गेली अनेक वर्षे हायस्कूल मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून सेवा बजावली.एवढेच नव्हेतर निवृत्तीच्या वेळी मुख्याध्यापक म्हणून ही सेवा बजावली.त्यामुळे विद्यार्थी हे त्याचे सर्वस्व असल्याने त्यानी विद्यार्थ्या समवेत भेटून त्याच्या बरोबर फोटो ही घेतला.
त्यामुळे विद्यार्थ्यामधुन एक प्रकारचा आनंद व चेहर्यावर समाधान पसरले होते.सोबतच शिक्षक वर्ग ही उपस्थित होता.

