#सोमवारी महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
डोंगरगाव ( ता.खानापूर ) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही उद्या रविवारी दि.११पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ होत आहे.
दोन दिवस चालणार्या या पारायण सोहळ्याची सुरूवात ग्रामदैवताचे पुजन शाहु गुरव,शांताराम पाटील यांच्याहस्ते हो मार आहे. रविवारी दि.११ रोजी पोथी स्थापना हपभ रामू कोलेकर यांच्याहस्ते होऊन होणार आहे.
या वेळी दीप प्रज्वलन गुरूपीर योगी भयंकर नागनाथ महाराज ,माजी आमदार अरविंद पाटील,बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर वकील संरचना अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाॅक कांग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाटी आदींच्यावतीने होणार आहे.
तर विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
सोमवारी दि.१२ रोजी पहाटे काकड आरती, कालाकिर्तन, दिंडी होऊन दुपारी महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी सर्वाना पारायण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
