# बीईओ पी. रामाप्पा यांची भेट शिक्षकांची व्यवस्था करण्याचे आश्वासन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुघवडे ( ता.खानापूर ) येथील पहिली ते सही वी पर्यतच्या सरकारी प्राथमिक मराठी श्वेत गेल्या दोन वर्षापासुन एक ही मराठी शिक्षक नाही. केवळ कन्नड शिक्षक व अतिथि शिक्षकावर शाळा चालते.
ही समस्या पाहून निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य व खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी बीईओ पी रामाप्पा व पी डी ओ श्री मोकाशी यांच्या समवेत मुघवडे शाळेला भेट देऊन परिस्थीची पाहणी केली .
या वेळी विनायक मुतगेकर यानी सांगीतले निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीत ही शाळा येत असुन या शाळेत पहिली ते सहावी पर्यतचे वर्ग आहेत.पटसंख्याही ३० विद्यार्थ्याच्या आसपास आहे.असे असताना याशाळेला गेल्या दोन वर्षापासुन मराठी शिक्षकच नाही. केवळ कायम स्वरूप कन्नड शिक्षक तेवढाच आहे.अतिथि शिक्षकांच्यावर मराठी शाळा चालते. तेव्हा मराठी शिक्षक कायम स्व रूपी देणे गरजेचे आहे.अशी मागणी बीईओ पी.रामाप्पा यांच्याकडे केली.
या वेळी बीईओ पी रामाप्पा यानी शाळेची तपासणी करून लागलीच एका मराठी शिक्षकाची मार्च पर्यत टेप्यूटेशनची सोय करतो.,त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षापासुन कायम स्वरूपी मराठी शिक्षकाची नेमणुक करतो.असे आश्वासन दिले.
बीईओनी परिसर पाहुन समाधान व्यक्त केले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.