#काॅग्रेसच्या पत्रकार परिषद खुलासा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भाजपचे खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यानी काॅग्रेसच्या माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर या कामे मंजुर होण्यास आडथळा आणत आहेत. असा आरोप नुकताच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. हा आरोप साफ खोटा असुन गेली तीन वर्षे आमदारकी काळात किती विकासाची कामे केली आहेत.या विकास कामासाठी मुख्यमंत्र्याच्या भेटी व विविध खात्याच्या मंत्र्याच्या भेटी घेऊन त्याचा पाठ पुरा वा करावा लागतो. तेव्हा आमदारानी मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याच्याकडे कितीवेळा पाठ पुरावा केला हे बाजुला सारून केवळ आणि केवळ काॅग्रेसच्या मा जी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर या अनुदान थांबवत असल्याचे खोटा आरोप केल्याचे खानापूर तालुका ब्लाक काॅग्रेसचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी सोमवार दि.५ रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषद खंडन केले.
प्रारंभी शहर अध्यक्ष महांतेश राऊत यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी अँड.घाडी म्हणाले की भाजपचे सरकार होते त्यावेळी माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यानी तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या मुख्यमंत्री व इतर मंत्र्याच्या भेटीगाठी घेऊन तालुक्यासाठी मोठे अनुदान मंजुर विकास साधला.तर आता तुम्हाला का होत नाही. ना ही तर मंत्र्याच्या भेटीचा आ वा हल सादर करा.
नुकसान लिलावडे भागातील मुघवडे,आंबोळी,दा रो ली भागात हत्तीकडुन. उस पिकासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान केले.यावर तुमची स्पष्ट भुमिका दिसुन येत नाही.दुसरीकडे काॅग्रेसच्या पाच गॅरंटी योजनाची महत्व वाढले.याची पोटदुखी वाट ते का? असा सवाल केला.
या वेळी काॅग्रेसचे नेते सुरेश जाधव म्हणाले की , आम दा रानी आपल्या आमदारकी काळात किती वेळा केडीपी बैठक बोलावुन समाचार घेतला.त्यामुळेच अधिकार्यावर वचक रा हि ला नाही.माजी आम दार डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या काळात लिंगनमठ व नागरगाळी हलशी रस्त्यासाठी प्रत्येकी पाच पाच कोटी रूपये अनुदान मंजूर होऊन आज तागायत रस्त्याची कामे झाली नाहीत.
तालुक्यातील अधिकार्यावर आम दा रांची वचक नाही.त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक सरकारी कार्यालय बात अंदाधुंदी कार भार शुर आहे.याचा त्रास तालुक्याच्या जनतेला सहन कारावा लागत आहे.याचा विचार करून अधिकार्याच्या बैठकी घेणे गरजेचे आहे.यावेळी अनेक मुद्दा वर त्यानी ताषेरे ओढले.
या वेळी महादेव कोळी यानी ही भाजपच्या आम दा रानी आपल्या काळात कोणतेच ठोस निर्णय घेतले नाहीत.,त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला असा आरोप केला.
पत्रकार परिषेद त चर्चेत आलेल्या १४ कोटी रूपये निधीच्या रस्त्याच्या कामात कोणाच्या जमिनीचे अतिक्रमण असल्यास दुजाभाव न करता रस्त्याचे काम योग्य व रस्ता रूंध्द झाला पाहिजेत अशी सुचना केली.
पत्रकार परिषदेला खानापूर ब्लाॅक कांग्रेस अध्यक्ष महिला नेत्या सावित्री मादार , दिपा पाटील, रायापा बडगणावर, नगरसेवक लक्ष्मण मादा, तोहिद,चांदकन्नावर, परशराम लाड,जोतिबा शिवनगेकर,आदी काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.