#समर्थ स्कूलला उत्कृष्ट स्काऊट अँन्ड गाईडचा किताब!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल च्या विद्यार्थ्यानी नुकताच बेळगाव (होनगा) येथे द भारत स्काऊट अँन्ड गाईड कर्नाटक २९ वे जंबोरेट २९ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यत पार पडले.
या स्काऊंट अँन्ड गाईड मेळाव्यात समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल च्या १५ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी अँडव्हेन्चर,एज्यूकेशन टूर,
क्रियेटीव्हीटी,फोक डान्स,प्रदर्शन, फूड प्लाजा आदी कार्यक्रमात भाग घेऊन उज्वल यश संपादन केले.व समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल चे नाव उज्वल केले.
या कार्यक्रमात १५ विद्यार्थ्याचा सहभाग होता.यामध्ये १० विद्यार्थी गाईड व ५ विद्यार्थी स्काॅऊट मध्ये सहभागी झाले होते.
यावेळी स्काँऊट म्हणून स्कूल चे शिक्षक सचिन गुरव गाईड म्हणून तर अँडमिन म्हणून सौ.दिव्या नाडगौडा यानी उपस्थिती लावली होती.
या वेळी स्कूलचे चेअरमन एफ.एम.पाटील, व सचिव डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी स्कूल च्या विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

