#मराठा समाजाचे प.पू. श्री.श्री मजुंनाथ स्वामीजीचे मार्गदर्शन!
खानापूर प्रतिनिधी
आखिल भारतीय मराठा समाजाचे व गोसावी मठ बेंगलुरचे मठाधिश प.पु.श्री श्री. मंजुनाथ स्वामीजी हे आज सोमवारी दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात आगमन होऊन त्यानंतर शिवस्मारकांत शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठिक साडे तीन वाजता खानापूर येथील मलप्रभा नदीकावरील हरेकृष्ण मंदिराच्या पटांगणात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
