#वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलचा बक्षीस वितरण समारंभ आणि वार्षिक स्नेहसमंलन बुधवारी दि.२४ रोजी अति उत्साहात पार पाडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक शपरशुराम अण्णा गुरव उपस्थित होते .
तर प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा उपस्थित होते. तसेच खानापूर संपन मुल व्यक्ती श्री मोरे , कमार, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
या वेळी क्षेत्र शिक्षण अधिकारी पी. रामाप्पा बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जे बक्षीस मिळालेले असतात. आज प्रत्यक्षात मिळवण्याचा दिवस म्हणजे वार्षिक बक्षिसमारंभ उत्सव होय. पुढे येणारे दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेऊन पास व्हावेत. त्यासाठी भरपूर अभ्यास करावेत.ज्ञान वाढवून घ्यावेत असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. व आजच्या दिवशी वर्गवार व शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली. शाळेचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून राजू व उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कविता वरकडकर यांची निवड करण्यात आली त्यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. व तसेच 2025 एप्रिलमध्ये दहावीत सर्विस जास्त मार्क मिळवून मराठी विभागामध्ये प्रथम आलेला विद्यार्थी ताडोबा आळवणी व त्यांच्या पालकांना शाल व श्रीफळ देऊन व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आले कुमार चाळोबा आळवणी हा विद्यार्थी मराठी विभागामध्ये 98 टक्के मार्क घेऊन पास झालेला आहे. त्याचे स्तुत्य उपक्रमाने गौरवण्यात आले व सत्कार करण्यात आले. तसेच कन्नडमध्ये प्रथम आलेला ओंकार जरली या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला .
शेवटी अध्यक्षीय समारोप करत असताना मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी बोलता ना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचे सर्वांगीण विकास करून घेण्याबाबत प्रयत्न करावे. शालेय अभ्यासाबरोबरच खेळामध्ये व इतर शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःचे व्यक्तित्व सिद्ध करावे असे सांगून पुढे येणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. शेवटी सहशिक्षक सागर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक जोतिबा बिर्जे यांनी केले.
दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पार पाडले.
