संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुळचे गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व सध्या पुणे येथील लोहगाव रस्त्यावरील खेसे पार्कमधील आशा विद्यालय संस्थेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार अजित के.पाटील याना सैन्यातील उत्कृष्ट कार्य व समाज कार्यासाठी भारतीय सैन्याच्या सदर्न कमांड कार्यालयातर्फे विजय दिवसाचे औचित्य साधुन अनुभवी ,कर्त्वृत्वसंपन्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे ,सदर्न कमांडचे अधिकारी लेफ्टनंट जनरल दीपक सेठ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक प्रदान करून त्याना गौरविण्यात आले. यावेळी अनेक अधिकार्यानी युध्दातील आठवणी सांगीतल्या.


