संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलच्या वार्षिक क्रिडास्पर्धा नुकताच संपन्न झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे जेष्ठ संचालक पऱशराम गुरव उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमगड रेंज फाॅरेस्टे आँफिसर सय्यद नदाफ उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्याच्या पतसंचालनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
उदघाटन प्रसंगी बोलताना भीमगड रेंज फाँरेस्ट आँफिसर सय्यद नदाफ म्हणाले की, विद्यार्थ्याना अभ्यासाबरोबर क्रिडा स्पर्धाना तितकेच महत्व द्यावे. विद्यार्थ्यानी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये भाग घेऊन आपले कर्तृत्व दाखवावे.
अभ्यासाबरोबरच आरोग्य़ाकडे ही लक्ष द्या. असे आवाहन केले. अभ्यास आणि आरोग्य चांगले राहिले तर कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो.
शेवटी मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी म्हणाले की , साउंड माईड ईज साऊड बाॅंडी या म्हणी प्रमाणे चांगले शरीर आणि चांगले विचार एकत्र आले तर विद्यार्थी जीवन फुलवू शकतो.
प्रारंभी शाळेच्या विद्यार्थीनीच्या गणपतीच्या सुंदर गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती आर.टी. टक्केकर यानी केले.
तर आभार क्रिडा शिक्षक चंद्रकांत गोमानाचे यानी मानले.

