#१४ वर्षाखालील मुलीच्या नेटबाॅल संघाचे कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राजस्तरीय नेटबाॅल स्पर्धा चामराजनगर येथील डाॅ.बी .आर.आंबेडकर स्टेडियमवर दि.१३ व १४ डिसेबरला पार पडल्या.
या राज्यस्तरी नेटबाॅल स्पर्धेत समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे १४ वर्षा खालील व १७ वर्षा खालील मुला मुलीचे नेटबाॅल सहभागी डाले होते.
१४ वर्षा खालील मुलीचा नेटबाॅल संघाची अंतिम फेरी पर्यत मजल!
खानापूर तालुक्यात प्रथमच समर्थ इंग्लिश मि डी यम स्कूल च्या नेटबाॅल संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करत राज्य स्तरीय स्पर्धेपर्यत मजल मारली.
या मध्ये १४ वर्षा खालील मुलीच्या संघाने विजयपूर, बेगलुर दक्षिण, या संघाचा परभव करत क्वाटर फायनलमध्ये मधुगीरी संघाचा परभव करत अंतिम फेरी म्हैसुर संघा बरोबर निसटता परभव पत्करावा लागला.
पहिल्यांदाचा राज्यस्तरीय नेटबाॅल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करणारा खानापूर समर्थ इंग्लिश मि डी यम स्कूलचा संघ अव्वल दर्जाचा खेळ खेळुन प्रेषकाची मने जिंकली त्याबद्दल संघाचे कौतुक केले जात होते.
खानापूर तालुक्यातुन समर्थ इंग्लिश मि डी यम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलीच्या नेटबाॅल संघाचे कौतुक होत आहे.
या संघाचे स्कूलचे सचीव डॉ.डी.ई.नाडगौडा व संचालकानी अभिनंदन केले.
नेटबाॅल संघाला कोच व क्रिडाशिक्षक बाळकृष्ण हलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर स्कूलच्या अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा व इतर शिक्षकाचे सहकार्य लाभत आहे.

