” गावकर्याचे म्हणने वाघाच्या
हल्ल्यात गाभण गाय ठार”
“वनखात्याचे म्हणऩे गायीचा मृत्यू गंभीर
आजाराने झाला”
खानापूर प्रतिनिधी
वरकड ( ता.खानापूर ) येथील गरीब शेतकरू सिधू रामू खरात यांच्या गाईचा गोट्यात शनिवारी मध्य रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली.मात्र प्रथम दर्शऩी गाईचे पोट फाडुन पोटातील भाग बाहर आला.त्यामुळे वरकड गावात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची चर्चा सुरू आहे.
या वेळी लोढा भागाचे वन अधिकार तेज वाय पी. यानी पशु खात्याच्या डाॅक्टरकडुन गाईचा मृत्याचा रिपोर्ट येई पर्यत गायीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे.हे नंतरच स्पष्ट होणार अशी माहिती वन अधिकारी तेज वाय. पी.यानी सांगीतले.
वरकड येथील शेतकरी सिद्दू रामू खऱात यानी शऩिवारी आपली गाभऩ गाय सायंकाळी बांधली होती. मात्र रविवारी गाय गोट्यात मृत्यु आवस्थेत सापडली.त्यामुळे गायीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. हे पशु खात्याच्या डाॅक्टरच्या रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे.
गाईच्या मृत्यूमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.तेव्हा शेतकर्याला आर्थिक मदत व्हावी.अली मागणी शेतकर्यातुन होत आहे.
