#जी आय टी काॅलेजच्या पदवी प्रदान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार#
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष अडॅ.ईश्वरराव आर. घाडी यांची कन्या कु. मयूरी ईश्वरराव घाडी हिने बेळगाव येथील जीआयटी काॅलेजमधुन एम.बी.ए पदवी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे.
नुकताच दि. २७ रोजी बेळगाव येथील जी आय टी काॅलेजमधील कन्विकेशन सर्टिफिकेट पदवी प्रधान समारंभ सोहळ्यात जीआयटीकाॅलेजचे डीन.एच.एन.शिवप्रसाद,
तसेच ऒरीयन कंपनीचे कित मचार्डो,व महेश खोत यांच्या उपस्थित कु.मयुरी हिला एम बी ए ची पदवी प्रदान करण्यात आली.
आपल्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून कु.मयुरी ही प्राथमिक शाळेपासुन हुशार विद्यार्थीनी म्हणून सर्वांच्या परिचयाची आहे.
तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सर्वोदय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. काॅलेजचे शिक्षण बेळगाव येथील गोगटे काॅलेज आँफ कामर्स मधुन बी.कॉम पर्यतचे शिक्षण डिस्टिंक्शन मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर. बेळगाव येथील जीआयटी काॅलेजमध्ये एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. तसेच दुबई येथे सुध्दा एम.बी.ए.चे प्रशिक्षण पूर्ण केले.
तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मयूरीने शिक्षणासोबत विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्येही सहभाग घेतला असून नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यासातील सातत्य या गुणांमुळे तिने उत्कृष्ट निकालाची नोंद केली. तिच्या यशामुळे वकिल संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्ष अँड.ईश्वरराव आर.घाडी व घाडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.पार्वती घाडी यानी कु.मयुरीचे अभिनंदन केले.
कु.मयुरीच्या यशा बद्दल घाडीकुटुंबासह खानापूर तालुक्यातून अभिनंदन होते आहे.