#फांद्या तोडून वाहतुकीचा अडथळा दूर करा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात उसाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाल्याने खानापूर तालुक्यातील ऊस वाहतूक सुरू झाली आहे.
खानापूर तालुक्यात जांबोटी भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. त्यामुळे या भागातून उसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सध्या खानापूर जांबोटी रस्त्यावरून ऊस घेऊन जाणारी वाहने वाढली आहेत.
एकीकडे खानापूर जांबोटी रस्त्याची दयनीय अवस्था असतानाच, रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांना यांचा अडथळा निर्माण होत आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांना फांद्या लागुन धोका निर्माण होत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याने रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या माळ करून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांना सोयीचे करावे. अशी मागणी जांबोटी भागातील ऊस उत्पादकातून होत आहे.
#खानापूर जांबोटी रस्त्या लगत नवलकर फॅक्टरी जवळ झाडांच्या धोकादायक फांद्यांचा बंदोबस्त करा!
यशवंत पाटील, निलावडे.
सध्या जाबोटी भागात ऊस तोडणीला जोर आला आहे. या भागातून ऊस वाहतूक महाराष्ट्र राज्याला तसेच कर्नाटकातील कारखान्यांना जात आहे .त्यामुळे जांबोटी खानापूर रस्त्याला लागून नवलकर फॅक्टरी जवळ असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आले आहेत त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांना याचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय फांद्यामुळे वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी फांद्या तोडून वाहतुकीचा अडथळा दूर करावा अशी मागणी. निलावडे ऊस उत्पादक यशवंत पाटील यांनी केली आहे.
