“हत्तीकडून गुंजी शिवारात भात पिकाचे नुकसान”
खानापूर प्रतिनिधी
गुंजी (ता. खानापूर ) गावच्या तेरेरांग शिवारात कापोली , डिगेगाळी भागातून आलेल्या तस्कर हत्तीने दाखल धाकलु चौंडी यांच्या भात शिवारात घुसून हातात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.
रात्री शेतकरी धाकलू चौंडी हे भात पिकाचे राखण करण्यासाठी शिवारात होते मध्यरात्री हत्ती आल्याची चाहूल त्यांना लागली परंतु भीतीपोटी त्यांनी घरचा रस्ता धरला.
सकाळी उठून शिवारात गेले असता हत्तीने भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याचे दिसून आले .
लागलीच गुंजी सेक्शन फॉरेस्ट राजू पवार यांना घटनेची माहिती दिली. गुंजी परिसरात हत्तींनी केलेल्या भात नुकसानीचे सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरून द्यावी. अशी मागणी गुंजी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
गुंजी परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षभर पिकाचे संरक्षण करून वाढविले आहे मात्र आता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे तिकडून प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यातून वन खात्याच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे संबंधित खात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तरी द्यावी तसेच लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून एकदा तरी झालेल्या नुकसान भरपाईची दाखल घ्यावी व हत्तीचा बंदोबस्त करावा. अशी जोरदार मागणी शेतकऱ्याचं होत आहे.
#हलसाल परिसरात हत्तीच्या कळपा कडुन पिकाचे प्रचंड नुकसान!
हलसाल ( ता.खानापूर) परिसरात गेल्या दोन दिवसापासून हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे तेव्हा वन खात्याने व लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान रुपये द्यावे अशी मागणी होत आहे.
हालचाल येथील शेतकरी मारुती तांबुळकर यांच्या शिवारातील हता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे तुडवून प्रचंड नुकसान केले आहे. त्याचबरोबर शेतकरी लक्ष्मण तांबुळकर, पंकज तांबुळकर, यांच्याशिवारातील भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
शेतकऱ्यांनी हत्तींना हिसकावून लावण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी फटाके वाजवून घालवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच हत्तीनी मारुती तांबुळकर यांच्या शिवारातील भात पिकाचे नुकसान केले.
एकीकडे हत्तींच्या मृत्यूने सुळेगाळी गावच्या शेतकऱ्याला कायदेशी कारवाई करून शिक्षा दिली. मात्र शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान करून लाखो रुपयाचा आर्थिक तोटा सहन करावा लागला याला वाली कोण असा सवाल शेतकऱ्यातून होत आहे. तेव्हा वन खात्याने व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी शेती वर्गातून होत आहे.

