बे#ळगाव व्हि.टी.यू मध्ये टेलिफोन आपरेटर म्हणून २० वर्ष सेवा बजावली!
सन.२००६ नोकरी सुरू.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील अंध उमेश चिन्नाप्पा जवळी हे गेली वीस वर्षे बेळगाव येथील व्हि टी यू मध्ये बीएसएनएल ऑपरेटर म्हणून सेवा बजावली. तेथून ते सेवानिवृत्त झाले.
यानिमित्त शनिवारी दिनांक 8 रोजी खानापूर येथील मधुवन सभागृह सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रास्ताविक विनोद हळेमनी यांनी केले .
अंध उमेश जवळ यांनी म्हैसूर येथील अंधशाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर सन 2006 मध्ये माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जनता दर्शन कार्यक्रमात अंध उमेश जवळी यांना बेळगाव व्हि टी यू मध्ये टेलिफोन ऑपरेटर ची नोकरी दिली. सन 2006 पासून आज पर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली.
यावेळी अंध उमेश जवळी यांच्या सेवानिवृत्त सोहळ्याला सुनील उप्पीन,इराणा जवळी, चन्नराज उप्पीन,दीप्ती बडदाळे,सुरेश पाटील तसेच खानापूरचे काँग्रेस नेतेचंबाना होसमनी, माजी नगराध्यक्ष बसवप्रभू हिरेमठ, नगरसेवक आपय्या कडोळी, जगदीश होसमनी, नगरसेविका मेघा कुंदरगी,शिल्पा कल्याणी आदी उपस्थित
होते.
यावेळी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी उमेश जवळ यांच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढून त्यांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला राजु उप्पीन, येळ्ळूर सर, राजू जांबोटी, इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर कुंदरगी यांनी केले