संदेश कांती न्यूज,
गर्लगुंजी ( ता.खानापूर) येथील अमृतनगरातील श्रीमती कै. सुमित्रा शंकर पाटील यांचे दि. 29. ऑक्टोंबर 2025 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या अकराव्या दिनी त्यांच्या विषयी थोडक्यात परिचय……..
श्रीमती सुमित्र शंकर पाटील यांचा जन्म कल्लेहोळ (ता.बेळगांव ) प्रतिष्ठित आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये दि. 1 जून 1946. मध्ये झाला. चार भाऊ, चार बहिणी, आई वडील अशा कुटुंबात वाढलेल्या असून त्यांचे वडील सुब्राव शट्टूप्पा पाटील हे गावचे प्रमुख व प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने सर्व भावंडावर चांगले संस्कार लाभले आहेत.
आईचे वैवाहिक जीवन मोठ्या हालक्याचे व कष्टाचे होते. पती कै.शंकर रामचंद्र पाटील त्यांचे तीन भाऊ व तीन बहिणी, सासू-सासरे असा मोठा परिवार असल्याने व शेतकरी कुटुंबातील असल्याने सुरुवातीचा काळ खूप बिकट होता. विवाह नंतर पतीची नोकरी सुरू झाल्यानंतर कुटुंबात स्थिरता येऊ लागली. सासू-सासर्यासमवेत कठोर परिश्रम घेऊन . दीर, जाऊ व नंदा यांच्यासोबत संसार थाटला.
आईला आम्ही चार मुलं. तिघं मुलगे, एकटी मुलगी. आईने अपार कष्ट घेऊन आम्हाला लहानाच मोठ केल. आणि संस्कारक्षम बनविल.
आईच्या सुसंस्काराखाली आम्ही चारही मुलं सुशिक्षित आहोत. आईची जिद्द चिकाटी व कष्ट करायची अपार शक्ती व निस्वार्थी मन अनेक गुणाचे अनुकरण करत आम्ही आज कौटुंबिक व सामाजिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत.
आईच्या आशीर्वादाने आम्ही चारही भावंडे उच्चशिक्षित राहून आपल्या व्यवसायातील उच्च पदावर कार्यरत आहोत. आणि सर्वांचे जीवन यशस्वी होण्यामागे आईच मोठा आशीर्वाद आहे.
तीन मुलगे ,तीन सुना, एक मुलगी, जावई व दहा नातवंडे अशा मोठ्या कुटुंबातून आई निघून गेल्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढणे अशक्य आहे.
आज सर्वांना सोडून ही माता देवाघरी निघून गेली.त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
तुझा मुलगा
सुनील शंकर पाटील