#खानापूर म ए समितीचे खासदार हेगडेना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहर अंतर्गत येणाऱ्या मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर या रस्त्याला 14 कोटी रुपये निधी मिळाला आहे. तेव्हा एक किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये निधीचा वापर करावयाचा आहे. मात्र प्रत्यक्षात रस्ता खाणून तीच माती वापरण्यात आली आहे. केवळ सहा इंचावर काँक्रीट टाकण्यात आला आहे. तेही निकृष्ट् दर्जाचे आहे.
. रस्ता एकाच वेळी उखडून टाकला आहे. त्यामुळे शिवस्मारक ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्यावरुण नागरिकांना वाहनधारकांना येजा करणे कठीण झाले आहे.या भागातील बसेस या मार्गावरून बंद झाले आहेत. तसेच व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
याशिवाय नदी पुलावरील लोखंडी पाईप हे सुद्धा जुनेच वापरले आहेत.
तेव्हा मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळ पर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
संबंधित कंत्राटदराने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 14 कोटी रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची भीती खानापूर शहरातील नागरिकांना वाटत आहे.
तेव्हा खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करून वेळीच दखल घ्यावी. अन्यथा खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या रस्त्याचे काम बंद पाडू. असे निवेदन कारवार मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे गुरुवारी खानापूर भेटीवर आले असता निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना, खानापूर महाराष्ट्र एका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी, समिती ने ते प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील , पांडुरंग सावंत, राजाराम देसाई आणि समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
