“खानापूर आशिर्वाद हास्पिटलवतीने वंदे मातरम वर्धापन दिन साजरा”
#डॉक्टर डी. ई.नाडगौडा यांच्या हस्ते पूजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. बकिंम चटर्जी यांच्या वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खानापूर आशीर्वाद हॉस्पिटल वतीने शुक्रवार दि. ७ रोजी खानापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी.ई.नाडगौडा यांच्या अध्यक्षतेखाली वंदे मातरम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी खानापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी.ई. नाडगौडा म्हणाले की वंदे मातरम हे गीत 150 वर्षापासून प्रेरणा देत आहे. लढविण्याची शिकवण देत आहे.सन १८७५ साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी देशाचा अभिमान म्हणून हे गीत संपूर्ण देशात गाईल जातं. अशा शब्दात वंदे मातरम गीताचे महत्त्व पटवून दिले.
त्यानंतर सर्वानी एका सुरात वंदे मातरम गीत गाऊन दाखविले.
या कार्यक्रमाला खानापूर डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर डी ई नाडगौडा, एडमिन डॉ. इर्षाद, नर्स प्रियांका राधिका बरगावकर निकिता नार्वेकर विल्मा डिसोजा, मनीषा घाडी, अनुपमा बरगुकर,फातिमा मुल्ला भक्ती चनेवाडकर व ज्ञानेश्वर भाकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.