#”खानापूर वकील संघटनेच्या वतीने वंदे मातरम वर्धापन दिन साजरा”!
खानापूर प्रतिनिधी
वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. बकिंम चॅटर्जी यांच्या वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्नाटक राज्य वकील संघटनेचे आदेशानुसार खानापूर वकील संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. ७ रोजी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या अध्यक्षतेखाली वंदे मातरम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की वंदे मातरम हे गीत 150 वर्षापासून प्रेरणा देत आहे. लढविण्याची शिकवण देत आहे. अशा शब्दात वंदे मातरम गीताचे महत्त्व पटवून दिले.
त्यानंतर वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी एका सुरात वंदे मातरम राष्ट्रगीत गाऊन दाखविले.
या कार्यक्रमाला खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, अँड व्ही. एन. पाटील, अँड. आय. बी लंगोटी, एम . व्ही. देशपांडे, एस. एन.लोटुकर,एम.आर. हिरेमठ, पडी पाटील, इर्शाद नाईक, एम.वाय कदम. एम. ए. पाटील,स्वाती पाटील,केशव कळेकर,मंजुषा मणेर, मलप्रभा कदम, सुरेखा उप्पीन, व इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
