#ऐन सुगीत मजूर मिळण्यावर यंत्राचा वापर योग्य”!
संदेश क्रांती न्यूज:
सुहास पाटील
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात यंदा पावसाने हजेरी लावल्याने भात सुगीला उशीर झाला. त्यातच तालुक्याच्या जंगल भागात हत्तीनी भात पिकात धुमाकूळ घातला. त्यामुळे जंगल परिसरातील भात कापणी उशिरा सुरू होत आहे.
ऐन भात कापणीच्या सुगीत यंत्राच्या साह्याने भात कापणी करण्यास खूप मदत होणार आहे. एकीकडे मजूर मिळणे कठीण झाले आहे. सरकारच्या रोजगार हमी योजनेने मजुरांची मजुरी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक बाबतीत अडचणी आला आहे. तर दुसरीकडे मजूर मिळणे कठीण झाले आहे.
अशा हंगामात भात कापणीला यंत्राची मदत झाल्याने हंगामशीर भात कापणी होते. शिवाय मजूर मिळवण्यासाठी धडपड ही कमी लागते. भात कापणीच्या यंत्राने भात कापणी करणे सोयीचे होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी भात कापणी यंत्राने भाते कापून सुगी वेळेत करून घेणे योग्य ठरणार आहे.
तालुक्याच्या गावोगावी अशा भात कापणी यंत्राची सोय झाली तर शेतकरी सुखावेल. व लवकरात लवकर आपली भात सुगी करून मोकळा होईल. तेव्हा भात कापणी यंत्राद्वारे केल्यास मजुरांचा त्रास होणार नाही . व वेळेत भात कापणी होऊन सुगी होण्यास मदत होते.
