#तुटून पडलेल्या विद्युत तार्यांचा धक्का बसल्याने हत्तींचा बळी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे.गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील काही भागात हत्तीने भात,ऊस पिकावर ताव मारून बरेच नुकसान केले असताना आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी सुलेगाळी (ता. खानापूर) गावाजवळील शेतवाडीत विद्युततारांचा स्पर्श होऊन दोन हत्ती दगावल्याची घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली याबाबत माहिती अशी की, सुलेगाळी येथील शेतकरी गणपती गुरव यांच्या शेतात सौर कुंपण लावण्यात आले होते. त्यावर हेस्काम खात्याच्या विद्युत तारा पडल्याने अतिरिक्त वीज पुरवठा सुरू झाला. याचवेळी अचानक दोन हत्तींनी भात शिवारात घुसण्याचा प्रयत्न करताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन हत्तींच्या मृत देहाची तपासणी केली.असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

