#आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कांजळे ( ता . खानापूर) येथील युवकाने गळ्यापासून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी घडली.
युवकाचे नाव सोमनाथ रमेश कुदळे ( वय. २१) आहे.
घटना स्थळावरून मिळाली माहिती अशी की, कांजळे गावचा युवक सोमनाथ कुदळे याने गावालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
घरचे शेण काढण्यासाठी गोट्यात गेली असता, सोमनाथ गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. हे पाहून घरच्याने हंबरडा फोडला. लागलीच दोरी कापून खाली उतरविले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
लागलीच खानापूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व पंचांग करून मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमनाथ यांच्या आत्महत्या नेमके कारण समजू शकले नाही.
त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा असा मोठा परिवार आहे.