#ग्रामपंचायत सदस्य संघटनेचेअध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील खेडोपाडी पंचायत क्षेत्रातील गाव व गल्लीतील विद्युत पथदीप, रोषणाई विद्युत खांब यासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायतला करावा लागत होता.
आता एकूण होणाऱ्या खर्चापैकी निम्मा खर्च सरकार उचलणार आहे. तर निम्मा खर्च ग्रामपंचायतला भरावा लागणार आहे अशी माहिती खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी बोलताना दिली. त्यामुळे ग्रामपंचायत बरोबर नागरिकनाही दिलासा मिळाला आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी संबंधित हेस्कॉम खात्याशी संपर्क करावा असे आव्हान त्यांनी केले आहे.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की संबंधित ग्रामपंचायतीला पंधरावा अयोग योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनेतून खर्च करता येतो. गल्लीतील पुरवठ्यासाठी आलेल्या खर्चापैकी निम्मा खर्च सरकार करणार आहे . तर निम्मा खर्च ग्रामपंचायत बैठकीत ठराव पास करून हेस्काम खात्याला माहिती द्यायची आहे . त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सरकारच्या नवीन योजनेनुसार ग्रामपंचायत तसेच गावच्या नागरिकांनी गल्लीतील विद्युत पथदीप व रोषणाई साठी सरकारने घेतलेला निम्माखर्च करण्याचा निर्णय मोलाचा ठरणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीनी पुढे येऊन नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. असे आव्हान. खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केले आहे.


