#हालसाल येथे गणेश मंदिरची चौकट पूजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गावात मंदिर असणे, हे गावचे भूषण आहे. मंदिरामुळे गावातील नागरिकात भक्तीचा प्रसार होतो. गावात सुख शांती समाधान सुख शांती समाधान लागतात लाभते. त्यामुळे मंदिर हे गावचे भूषण आहे. एवढेच नव्हे तर गावचे सौंदर्य आहे. यासाठी प्रत्येक गावात मंदिर उभारणी हे काळाची गरज आहे. असे मत खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी हालसाल ( ता . खानापूर) येथील गणेश मंदिराच्या चौकट पूजन प्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी पुजारी संजय देसाई होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव देसाई यांनी केले.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या हस्ते फीत कापून गणेश मंदिराच्या चौकटीचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत माजी चेअरमन संदीप देसाई, गोपाळ कुटे, तुकाराम जाधव, नागेश पाटील , कसरलेकर, बाबू कुलम, प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले .
उपस्थित पाहुण्यांची भाषणे झाली.
कार्यक्रमला गावातील ज्येष्ठ नागरिक, बालगोपाळ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव देसाई यांनी केले

