,
“# खानापूर मराठा मंडळ हायस्कूल मध्ये पालक मेळावा उत्साहात “!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ संचालित मराठा मंडळ सेकंडरी स्कूलचा पालक मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
पालक मेळावा च्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलणाने व फोटो पूजनाने झाली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी म्हणाले की जवळपास 210 पैकी 185 पालक हजर राहिल्याने आम्हाला समाधान वाटले. दहावीची परीक्षा व परीक्षा पद्धत, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच जादा वर्ग याबद्दल बोलताना ते म्हणाले की शिक्षक वर्ग चांगला निकाल लागण्यासाठी धडपडत आहेत तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे घरी मार्गदर्शन करावे असे आव्हान केले.
यावेळी जेष्ठ शिक्षक एस.डी.गुरव, एस एम मुतगी यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

