“गवी रेड्याच्या हल्ल्यात गवाळीचा शेतकरी गंभीर जखमी”
“हत्ती कडून पिकाचे नुकसान!
# जंगली प्राण्यांचा मनस्ताप!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति जंगलाने व्यापलेला तालुका आहे. तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील गवाळी
ता.खानापूर) गावचा शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय. 52 ) हे शुक्रवारी तारीख 24 रोजी सकाळी शेताकडे जात असताना झुडपात उभा असलेल्या गवि रेड्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
सोबत असलेल्या पत्नीने लागलीच आरडाओरड करत गविरेड्याला पळून लावले. गावात जाऊन घडलेली माहिती दिली. लागलीच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गवाळी पासून आठ किलोमीटर अंतरावरील नेरसा गावा पर्यंत तिरडी वरून आणण्यात आले. तिथून टेम्पो द्वारे खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. गंभीर शेतकरी प्रकाश गुरव याच्या पाठीमागे गवी रेड्याने शिंगांचे मारून मोठी जखम केली आहे. म्हणून लागलीच प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी श्री नदाफ दवाखान्यात दाखल झाले. त्यांनी जबाब नोंदवून घेतला.
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातून एकीकडे हत्तीकडून पिकांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे जंगली प्राण्याकडून माणसावर हल्ले होत आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जंगल भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी वन विभागाने तात्काळ उपाय योजना राबवाव्यात तसेच लोकप्रतिनिधी जाती निशी याकडे लक्ष द्यावे.अशी मागणी खानापूर तालुक्यातून जनतेतून होत आहे.

