#शेतकऱ्यावर संक्रांत!
#वनखात्यासह लोकप्रतिनिधींचा काना डोळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
ऐन सुगीच्या काळात मास्केनहट्टी शिवारात हत्तीकडून भात पिकाचे व उसाचे प्रचंड नुकसान होत आहे.
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला आहे त्यामुळे जंगली प्राण्यांचा वर्षभर त्रास सहन करावा लागत आहे सध्या सुगी च्या दिवसात हत्तीने हाता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे तसेच उसाचे प्रचंड नुकसान करत आहे.
शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळीच मास्केनहट्टी शिवारात हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे उभ्या भात पिकात हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे.
मास्केनटीसह, गस्टोळी, भरूनकी, करी कट्टी, अधि शिवारात हत्तीनी ठाणे मांडुन उभ्या पिकांची नुकसान केले आहे.
त्यामुळे गरीब शेतकऱ्याचे कंबर्डे मोडले आहे. याकडे संबंधित वन खात्याचे तसेच लोकप्रतिनिधीचे डोळेझाक होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी अद्याप कुणीच याची दखल घेतली नाही मात्र शेतकरी हत्तींना पळवून लावण्यासाठी धडपडत आहेत.
सध्या सर्वत्र सुगीचे हंगाम आले आहे त्यातच पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे आता तोंडाशी आलेले भात पीक हत्तींच्यामुळे हातातून जाणारे अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यासाठी वन खात्याने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


