संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहर अंतर्गत येणाऱ्या मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता एकाच वेळी उखडून टाकला आहे. त्यामुळे शिवस्मारक ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्या ची दयनीय अवस्था झाली आहे.
नागरिकांना रिक्षातून घेऊन जाताना अतोनात त्रास होत आहे. त्यातच भाडेही कमी दरात देत आहेत. शंभर रुपयाच्या ठिकाणी 50 रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी. अशी समस्या खानापूर शिवस्मारक चौकातील रिक्षा चालकांनी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी त्यांच्याकडे मांडली.
यावेळी रिक्षा चालक म्हणाले की, प्रवाशांना, वाहनधारकांना येजा करणे कठीण झाले आहे.या भागातील बसेस या मार्गावरून बंद झाल्या आहेत. तर रिक्षा चालवणे याहून कठीण आहे. रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी रिक्षा चालकांनी ही केली आहे.
