“वंटमुरी घाटात दुचाकी ला मागून धडक युवक जागीच ठार!”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता खानापूर) येथील युवक दुचाकीवरून इचलकरंजीला जात असताना बुधवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी पहाटे बेळगाव जवळील वंटमुरी घाटात दुचाकीच्या अपघातात जागीच ठार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की चापगाव येथील युवक श्रीधर निगाप्पा पाटील (वय. 31) हा इचलकरंजी (महाराष्ट्र) येथे गवंडी कामा निमित्त राहत होता. दसरा सणानिमित्त चापगावला आला होता. बुधवारी पहाटे चापगाव वरून इचलकरंजीला दुचाकीवरून जात होता . पहाटेच्या वेळी वांटमुरी घाटात दुचकीला मागून अज्ञात वाहनाने ठोकल्याने तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चापगावात घटनेची माहिती मिळताच माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांनी लागलीच बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
श्रीधर यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
या घटनेने चापगाव गावावर शोककळा पसरली आहे.