खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता खानापूर) येथील संयुक्त हनुमान तालीम मंडळाच्या वती ने आज गुरुवार दिनांक 25 रोजी खास दसऱ्याच्या सना निमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा चे आयोजन सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे.
विजयी कबड्डी संघाने पहिले बक्षीस १२००१ रुपये, दुसरे बक्षीस ८००१ रुपये, तिसरे बक्षीस ५००१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. याचबरोबर वैयक्तिक बक्षीस ही देण्यात येणार आहेत.
ती कबड्डी संघाने त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य नागराज यळूरकर यांच्या हस्ते होणारे आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा रेशन संघटना उपाध्यक्ष महादेव दळवी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तरी इच्छुक कबड्डी संघाने मोबाईल नंबर ७२५९८०७५३२, ७९७४९५३८२० या क्रमांकाची संपर्क करावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
