संदेश कांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड( ता. खानापूर )येथे दुर्गामाता दौड चे आयोजन सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले. त्यातच बेकवाड येथे सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गावात नऊ दिवस हनुमान मंदिर जवळ पारायण सोहळा आयोजित केला जातो. दररोज सकाळी काकड आरती सायंकाळी प्रवचन व रात्रौ कीर्तन व महाप्रसाद केला जातो असा नऊ दिवस नवरात्र उत्सवात हा कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर नऊ दिवस गावात दौडीचे आयोजन केले जाते आज पारंपारिक पद्धतीत सादर केलेला आदर्श गल्लीतील देखावा अति उत्साहाने करण्यात आला बालचमुपासून आबला वृद्धापर्यंत या दौडीत सहभागी होतात आती उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतो
