“बुधवारी खानापुरात भाजपच्या वतीने रास्ता रोको “
#जांबोटी क्रॉस येथील बसवेश्वर पुतळ्या जवळ रास्ता रोको करून आंदोलन!
संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा निधी रोखण्यात सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदारांचा दबाव असल्याचा आरोप खानापूर तालुक्याचे भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी रविवारी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्राम धामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी ते म्हणाले की खानापूर तालुक्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करत असताना सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार रस्त्यासाठी मंजूर होणारा निधी रोखण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्याचे अनेक रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. परंतु माझे प्रयत्न सोडले नाहीत. मी प्रयत्न करून रस्त्यांचे कामे करणार आहे. असे सांगून बुधवारी दि. २४ रोजी खानापूर येथील जांबोटी क्रॉस वरील बसवेश्वर चौकात रास्ता रोको करून आंदोलन छेडणार आहे. असे सांगितले
प्रारंभी खानापूर तालुका भाजपचे सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी इटगी येथे सरकारी हायस्कूलच्या उभारणीसाठी तसेच गस्टोळी येथे हायस्कूल भरण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. असे बोलताना सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसू सानिकोप, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या सौ धनश्री सर देसाई, तालुका भाजप सेक्रेटरी मल्लाप्पा मारिहाळ, बाबुराव देसाई, भाजप युवा नेते पंडित ओगले, एडवोकेट चेतन मनेरिकर, एम.डी. सदानंद पाटील, नगरसेवक आप्पाया कोडोळी, राजू सिद्धांनी, भरमाणी पाटील आधी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
