संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता. खानापूर) येथील मार्केटिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
नंदगड मार्केटिंग सोसायटीवर एकूण 13 संचालकांची सदस्यपदी निवड होणार आहे.
या निवडीची प्रक्रिया शुक्रवार दि. 26 पासून प्रारंभ होणार आहे. या नंदगड मार्केटिंग सोसायटीवर एकूण 13 सदस्य आहेत.
यापैकी अ वर्ग सहकारी संघातून सात सदस्यांची निवड केली जाणार आहे. तर ब वर्ग व्यक्तिगत सदस्या कडून निवड केली जाते. यामध्ये परिशिष्ट जाती गटातून एक, परिशिष्ट जमाती गटातून एक , सामान्य महिला गटातून दोन, मागासवर्गीय अ वर्ग एक ,तसेच ब वर्ग गटातून एक असे एकूण सहा संचालक निवड केले जातात.
या निवडणुकीत अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे.
शुक्रवार दि. 26 पासून आचार संहिता प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे. तर दि. 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.
खानापूर तालुक्यात डीसीसी बँक निवडणुकी बरोबरच नंदगड मार्केटिंग सोसायटीची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानले जाते.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेचे नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या लक्ष लागून आहे.