संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उद्या
सोमवार, १५ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना व खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी हुबळी-दादर रेल्वेला हिरवा कंदील दाखवून थांब्याचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निधीतून स्थानकावरील प्रतिक्षालयाचा विस्तार, स्वच्छतागृहे, प्रवाशी शेड उभारणी तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार . तसेच खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे हे त्या दिवशी हल्याळ येथील कार्यक्रम करून खानापूरात रवळनाथ मंदिरातील पारायण सोहळ्यातही सहभागी होऊन त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
खानापूर तालुक्यात वारकरी संप्रदा असल्याने पंढरपूरला जाणारी ची संख्या ही अधिक आहे याचा विचार करून
वारकरी संप्रदायाच्या सोयीसाठी वास्को-पंढरपूर पॅसेंजर सेवा कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी. तसेच बेळगाव ते बंगलोर माजी खासदार अंगडी रेल्वेलाही खानापूरात थांबा द्यावा, यासाठी भाजपतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.